पत्रास कारण की…

इंटरनॅशनल लायब्ररी मध्ये पुस्तकांचे रॅक्स धुंडाळताना एकदा तिथे एक अख्खाच्या-अख्खा विभाग फक्त 'पत्र' या विषयावर आहे असं माझ्या लक्षात आलं. ती लायब्ररी बऱ्यापैकी लहानच आहे पण या विषयावरची जवळजवळ ५० पुस्तकं होती तिथे. आणि कितीतरी प्रकारची पत्र!

आर्नहेम-बरोबर ७४ वर्षांपूर्वी!

आर्नहेम हे पूर्व हॉलंड मधलं, ऱ्हाईन नदीवरचं जर्मनीच्या सीमेच्या एकदम जवळ असलेलं छोटंसं गाव आहे. दुसऱ्या महायुद्धातली एक खूप महत्वाची लढाई इथे झाली. महायुध्दाच्या इतिहासातला मित्र राष्ट्रांचा हा सगळ्यात मोठा पराभव होता असं म्हणतात. जेमतेम ७०-७५ वर्षांपूर्वी मी उभी आहे त्या ठिकाणी इतकं भयानक युद्ध झालं होतं हे फीलिंग फार ओव्हरव्हेलमींग होतं.

ड्युसलडॉर्फ डायरीज्

ड्युसलडॉर्फमध्ये प्रवेश करता क्षणी डार्मश्टाटच्या तुलनेत हे बरंच मोठं शहर आहे हे लक्षात आलं! वेगवेगळ्या देशातून आलेल्या मंडळींबरोबर, त्यांच्या देशातल्या वेगवेगळ्या गोष्टी ऐकत आणि ड्युसलडॉर्फ मधल्याच शिक्षिकेबरोबर, तिच्याकडून तिच्या लहानपणच्या अनेक गोष्टी ऐकत ड्युसलडॉर्फ पाहणं हा वेगळाच अनुभव होता. या शहराचं हे तयार झालेलं हे पहिलं इम्प्रेशन फार विशेष आणि वेगळं आहे हे नक्की!

बन बन आज फूली बसंत बहार!

गेल्या आठवड्यात नेदरलँडच्या ट्युलिप गार्डन्सच्या लीस गावात दरवर्षी होणारी फ्लॉवर परेड पार पडली. अनेक मित्रमैत्रणींनी फोटो टाकले होते आणि मला आमची गेल्या वर्षीची ट्रिप आठवली. Keukenhof Tulip Gardens या दरवर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चालू असतात. 'सिलसिला ' आणि अजुन काही बॉलीवूड चित्रपटातून आपल्यासारख्या भारतीयांना त्यांची तोंडओळख झालेलीच असते. त्यामुळे या दरम्यान भारतीय पब्लिक … Continue reading बन बन आज फूली बसंत बहार!

एक आगळी-वेगळी अंगत-पंगत

मग आम्ही इंडियन मेन कोर्स मील एकत्र मिळून करायचं ठरवलं. त्यांना अगदी काहीही करून माझ्या हातचं भारतीय जेवणाचा आस्वाद घ्यायचाच होता! मला त्यांना पनीर-रोटी-दालपेक्षा काहीतरी वेगळं खायला घालायचं होतं. मग मनात विचार आला की आपलं मराठमोळं काहीतरी का नको?

उड्या मारणारा घड्याळाचा काटा!

उद्या पासून आमच्या इथे जर्मनीत डी.एस.टी. सुरु होतंय! उत्सुकता म्हणून गुगलवर जरा शोधाशोध केली आणि केवढ्या गंमती-जमती समोर आल्या! त्या निमित्ताने म्हणलं जरा नवं काही लिहावं! म्हणून ही पोस्ट!